

वाशिम : मंगरुळपीर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शिवसेनेचे उमेदवार डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी शक्ती प्रदर्शन करत सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाशीम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातून आलेल्या शिवसैनिकांनी हाती मशाल आणि महाविकास आघाडीचे झेंडे घेऊन डॉ. देवळे यांना पाठिंबा दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. वाशिम-मंगरुळपीर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असून डॉ. देवळे यांच्या अर्ज दाखलीनंतर निवडणूक प्रचाराला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे.
यावेळी आमदार अमित झनक, महाविकास आघाडीचे कारंजा मानोरा विधानसभेचे उमेदवार ज्ञायक पाटणी, जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. सुधीर कव्हर, गजानन देशमुख, डॉ. भगवानराव गोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा वैशाली मेश्राम, डॉ. वैशालीताई देवळे, जेस्ट नेते माधवराव अंभोरे, रामप्रभू सोनोने, पांडुरंग ठाकरे, राजू चौधरी, चक्रधर गोटे, राजू वानखेडे, शंकर वानखेडे, दिलीपराव सरनाईक, दिलीपराव जाधव, मा. जि. प्र. राजेश पाटील राऊत, रमेश शिंदे, अनिल पाटील, सचिन परळीकर, विवेक नाकाडे, मा. जि. प. अ.सुभाष राठोड, जुबेरभाई मोहनावाले,माणिकराव सोनोने, देशमुख, वीरेंद्र देशमुख, कॅ. प्रशांत सुर्वे, माणिकराव देशमुख यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.Maharashtra Assembly polls