वाशिम : पुरात स्टंटबाजी करणे बेतले तरुणाच्या जिवावर; प्रवाहात वाहून मृत्यू

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील घटना
Stunt playing in the flood cost the life of Betley youth; Death by drifting
पुरात स्टंटबाजी करताना वाहून गेलेला तरुणPudhari Photo
Published on
Updated on

वाशिम : अजय ढवळे

शेलुबाजार येथील नदीमध्ये स्टंटबाजी करताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर उर्फ गोलु अरूण प्रधान (वय.३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सागर हा अडाण नदीच्या पुलावरून उडी मारत स्टंटबाजी करताना जिव गमावला. गेली दोन दिवसापासून जिल्हाभरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे परीसरातील नदी नाले तुटुंब भरून वाहत आहेत, या धरतीवर तरुण पाण्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसत आहे. या स्टंटबाजीमुळे सागरचा जीव गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कृष्णेच्या पुरात तरुणाची स्टंटबाजी | पुढारी

अडाण नदीमध्ये उडी घेतल्यानंतर पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे तरुणाचा शोध लागलेला नाही. या नदीमध्ये डुबक्या घेत असताना तरुणाला स्थानिक लोकांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तिथपर्यंत हा तरुण प्रवाहाच्या मेन धारेत खेचला गेल्यामुळे वाहून गेलेला आहे. या तरुणाची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु असून शोध पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले आहे. शेलुबाजार येथील अडाण नदीत तरुण वाहुन गेला तेथे मंगरूळपीर येथील तहसिलदार शितल बंडगर यांनी घटनास्थळी भेट दिली असून शोध मोहीम युद्ध पातळीवर राबविण्याचे आदेश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news