कृष्णेच्या पुरात तरुणाची स्टंटबाजी | पुढारी

Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या पाणी पातळी २१ फुटावर आहे. नदीपात्रात तरुणांकडून उड्या मारुन स्टंटबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी सांगली शहर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अधिक वाचा : अलमट्टी प्रकरणी महाराष्ट्र आणि कर्नाटक समन्यवयाने निर्णय घेणार, बैठकीत निर्णय

सांगलीत कृष्णेला पूर आल्यानंतर पाण्यात उड्या टाकून तरुणांकडून स्टंटबाजी करण्यात येते. सन २०१९ अणि २०२० मध्ये एका तरुणाने टाकलेली विमान उडी चांगलीच व्हायरल झाली होती. यावर्षी देखील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने कृष्णेला पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या आयर्विन पूलजवळ कृष्णेची पातळी २१ फुटावर आहे. त्यामुळे शहरातील एका तरुणाने आयर्विन पुलावरुन कृष्णेत उडी घेऊ न स्टंटबाजी केली.

अधिक वाचा : कुरुंदवाड-शिरढोण पुलाजवळ जलपर्णी तुंबली!

ही घटना समजताच सांगली शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाली. स्टंटबाजी करण्यासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे. स्टंटबाजी करण्यासाठी कृष्णेच्या पुरात कोणी उडी मारल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गेल्यावर्षी स्टंटबाजी करण्यासाठी कृष्णेत उडी मारलेला एक तरुण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे स्टंटबाजीबाबतीत पोलिस अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news