

Washim Groundnut Crop Loss in Unseasonal Rain
वाशिम: वाशिम जिल्ह्यात परिपक्व झालेला भुईमूग काढण्यास उशीर झाल्याने जमिनीतच भुईमूगाच्या शेंगाना अंकुर फुटू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळीवाचा पाऊस पडत असल्याने काढणीस आलेल्या भुईमूगाला उशीर झाला. त्यामुळे शेंगा परिपक्व होऊन कालावधी उलटल्याने जमिनीतच शेंगांना अंकुर फुटू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असून वळवाचा हा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.
वाशिम जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा 5 हजार 143 हेक्टरवर झाला होता. सध्या भुईमुगाचा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, मागील काही दिवसांत जिल्ह्यात वळीवाचा पाऊस पडत असल्यामुळे दुहेरी फटका बसला असून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.