Washim accident | कर्तव्यावरून परतताना काळाचा घाला, दुचाकीस्वार कर्मचाऱ्याला भरधाव टँकरने उडवले

चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या कामामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा होत आहे
 accident news
accident news (File Photo)
Published on
Updated on

वाशीम : रिसोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मेहकर मार्गावरील सरपखेडा फाट्यावर टँकर आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.११) दुपारी घडली.

घटनेनंतर या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता तर अगोदरही याच रस्त्यावर अनेक अपघात झाले असल्याचे बोलले जात आहे. सदर सद्या सुरू असलेल्या,चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या कामामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा होत आहे. रस्त्याच्या कामावर प्रश्न निर्माण झाले आहे. आपघाची माहिती मिळतात ठाणेदार रामेश्वर चेव्हाण,यांच्या निर्देशानुसार पोलिस पथक घटनास्थळी दाखल होत, स्थानिकांच्या मदतीनं जखमी अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा अपघात इतका भयानक होता की, विलास बारबले टँकरच्या चाकाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, प्रवीण पुन्नमवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमका अपघात कसा झाला ?

कुर्षी अधिकारी विलास बारबले (वय ५५) आणि सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण पुन्नमवार हे दोघेही आपल्या शासकीय कामानिमित्त एका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेटून रिसोडकडे दुचाकीने परतत होते. दरम्यान सरपखेडा फाट, समोरून येणाऱ्या एका भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला भीषणधडक दिली. या जोरदारधडकेत चिरडल्याने, कृषी विभागाचे मंडळ अधिकारी जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले सहाय्यक कृषी अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत‌. अपघातानंतर टँकर ड्रायव्हर फरार झाला आहे. पोलीस सध्या फरार टँकर चालकाचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news