

वाशिम : पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात सर्वत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार अकोला, यवतमाळ, वाशिम मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आज (दि.१६) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. Lok Sabha Election 2024
या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांसोबतच विशेष करुन महिला मतदारांचा टक्क वाढविण्यावर जिल्हा निवडणूक विभागाचा व जिल्हा प्रशासनाचा भर राहणार असून 'आम्ही आहोत महिला मतदार ! मतदानाचा हक्क अवश्य बजावणार !' हा या निवडणुकीचा स्लोगन असल्याची माहितीही त्यांनी दिली. Lok Sabha Election 2024
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा माहिती अधिकारी पवनकुमार राठोड आदी उपस्थित होते.
निवडणूक व आचारसंहितेच्या अनुषंगाने येत्या २४ तासांत विविध राजकीय पक्षाचे पोस्टर, बॅनर, स्टिकर आदी काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी संबंधित अधिकार्यांची चमू कार्यान्वित करण्यात आली आहे. मतदानाच्या ठिकाणी व्हिलचेअरची सोय करण्यात आली असून दिव्यांग व वयोवृध्दांसाठी घरातून मतदान करण्याची सोय केल्याची माहिती जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिली.
माध्यमांना निवडणुकीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष व माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होणार्या पेड न्युज तपासुन याबाबत कार्यवाही केली जाईल. जिल्हा निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याच्या त्यांनी सांगितले.
हेही वाचा