

वाशीम: पुढारी वृत्तसेवा : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरीता शासनाने राज्यस्तरावर टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४४७५ तसेच १०४, व वाशीम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या आदेशान्वये जिल्हास्तरावर टोल फ्री क्रमांक ८४५९८१४०६० दिले आहेत. स्त्री भ्रूण हत्येबाबत या क्रमांकावर नागरिकांनी तक्रारीची माहिती दिली असता त्या तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.
तसेच याबाबतची खातरजमा झाल्यावर संबंधित सोनोग्राफी गर्भपात केंद्रावर न्यायालयीन प्रकरण दाखल केल्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीस १ लाख रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. अविनाश झरे यांनी दिली आहे. समाजात अजूनही स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या अमानवी प्रवृतीची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होत आहे. याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.