

Washim District Hospital Patient Burnt Incident
वाशिम : जिल्हा रुग्णालयात अपेंडिक्सच्या ऑपरेशन दरम्यान एका रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे व्रण पाहिले. तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार देत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे.
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात 19 मे रोजी शिरपूर येथील रुग्ण अताऊल्ला खान या रुग्णांचे अपेंडिक्स चे ऑपरेशन करण्यात आले होते. दरम्यान, ऑपरेशन मशीन मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रुग्णाच्या पोटावरील त्वचा भाजल्याची घटना घडली. त्यामुळे नातेवाईकांनी या घटनेचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यपद्धती, तांत्रिक उपकरणांची स्थिती आणि शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे रुग्ण व रुग्णाच्या कुटुंबीयांनी दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही. तर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.