

वाशीम : कारंजा नगर परिषदेत अभियंता पदावर कार्यरत असलेल्या विजय घुगरे यांच्यावर वाशीम येथील एका तरुणीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी वाशीम शहर पोलिस ठाण्यात ९ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय घुगरे यांनी २०२२ पासून पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार शारीरिक शोषण केले. अखेर त्रस्त होऊन पीडित तरुणीने ९ जून रोजी वाशीम शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून घुगरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम 115(2), 351(2,3), 352, 69 बी एन एस अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या आरोपी विजय घुगरे फरार असून, अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे कारंजा नगर परिषदेत आणि वाशीम परिसरात खळबळ उडाली आहे.