MLA Sajid Pathan | आमदार साजिद पठाण यांना बिष्णोई गँगकडून धमकी; वाय दर्जाची सुरक्षा द्या

Washim Police | महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
Bishnoi Gang Threat MLA Sajid Pathan
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले Pudhari
Published on
Updated on

Bishnoi Gang Threat MLA Sajid Pathan

वाशिम: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार साजिद पठाण यांना बिष्णोई लॉरेन्स गँगकडून धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पठाण यांना तात्काळ वाय दर्जाची सुरक्षा तसेच एक स्कॉर्टिंग गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी वाशिम येथील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

17 फेब्रुवारी रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून 10 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. 10 कोटी द्या, नाहीतर तुझा गेम करू, अशी धमकी देखील देण्यात आली आहे. ही घटना गंभीर असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळे आज वाशीम येथील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम यांना निवेदन देऊन आमदार साजिद पठाण यांच्या सुरक्षेबाबत तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली.

Bishnoi Gang Threat MLA Sajid Pathan
Washim Farmer Life Ends | मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदीची चिंता, आर्थिक विवंचनेतून शेतकरी पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आमदार साजिद पठाण यांना मिळालेली धमकी ही गंभीर स्वरूपाची असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन आमदार पठाण यांना वाय दर्जाची सुरक्षा देऊन स्कॉर्टिंग वाहन उपलब्ध करून द्यावे.

यावेळी महाविकास आघाडीचे नगरसेवक शेख रशीद (नूर भाई), नगरसेवक साबीर बेग मिर्जा यांच्यासह मजहर अहेमद,अजीमोद्दीन, नईम शाह, अलताफ शाह, शेख आफताब, सय्यद अलीम, मुजाहिद अली, शेख, वाजीद, दाऊद हुसेन,अरबाज खान,शेख अजीज, शेख मतीन, शेख आसिफ, जिया मिर्जा, नसीब मिर्जा आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news