ट्रॅक्टरला दुधाच्या वाहनाची धडक; तरुण ठार, एक गंभीर

हा भीषण अपघात रिसोड-सेनगाव मार्गावरील मुंगसाजी नगरजवळ घडला.
 Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

Milk Tanker Collides with Tractor; Youth Killed, One Critically Injured

वाशीम : पुढारी वृत्तसेवा दुधाचे कॅन घेऊन जाणाऱ्या 'इंट्रा' वाहनाने समोर चालणाऱ्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रिसोड-सेनगाव मार्गावरील मुंगसाजी नगरजवळ घडली.

 Accident News
Gadchiroli Accident : गडचिरोलीत भीषण अपघात! दोन कारची समोरासमोर धडक; आश्रमशाळेचा विद्यार्थी ठार, महिला गंभीर

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील खिलार येथील दतराव चिलधर आणि वैजनाथ मुकाडे हे आपल्या वाहनाने (क्र. MH 38 X 3890) दुधाचे कॅन घेऊन रिसोडकडे येत होते. रात्री ११ च्या सुमारास मुंगसाजी नगरजवळ त्यांच्या वाहनाने समोरील एका अज्ञात ट्रॅक्टरला पाठीमागून भीषण धडक दिली.

धडक इतकी जबरदस्त होती की, वाहनाच्या क्लिनर साईडचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये वैजनाथ भाऊराव मुकाडे (२४, रा. खिलार) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक दतराव धुरपतराव चिलधर (२६) हे गंभीर जखमी झाले.

 Accident News
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आयशरची ब्रेकडाऊन ट्रकला धडक

अपघाताची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गीते यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह वाहनात अडकल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तब्बल दीड तासांच्या प्रयत्नानंतर वैजनाथ यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जखमी चालकास तातडीने रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर संबंधित अज्ञात ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. २५ एप्रिल रोजी सकाळी मृतदेहाचे विच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नसली, तरी रिसोड पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news