Washim Protest | वाशिममध्ये मातंग समाजाचा मोर्चा; अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची मागणी

नुसूचित जातींचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे,
Washim Matang Community Protest
वाशिम शहरात मातंग समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलेPudhari
Published on
Updated on

Washim Matang Community Protest

वाशिम : अनुसूचित जातींना न्याय्य हक्क मिळावेत तसेच समाजावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी वाशिम शहरात मातंग समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक आणि समाजबांधव सहभागी झाले होते. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चेकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

Washim Matang Community Protest
CJP Protest Washim | वाशिम येथे कॉकरोच जनता पार्टीचे बुधवारी धरणे आंदोलन

यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातींचे वर्गीकरण करून प्रत्येक घटकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व व आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी केली. तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Washim Matang Community Protest
Washim crime | रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई : मध्यरात्री तलवारीसह संशयित ताब्यात, वाहन व मोबाईलसह मुद्देमाल जप्त...

"अनुसूचित जातींचे वर्गीकरण करा, न्याय्य हक्क द्या" या घोषणांनी वाशिम शहर परिसर दुमदुमून गेला. मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, यावेळी मोर्चाला पोलिसांचा चोक बंदोबस्त होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news