

Cockroach Janata Party Agitation
वाशिम: वाशिम जिल्ह्यात कॉकरोज जनता पार्टी च्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी बुधवारी (दि. 24) ठीक सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रलंबित मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
भारतामध्ये नीट ,एमपीएससी ,पोलीस भरती यासोबतच इतर स्पर्धा परीक्षा यांचे पेपर दिवसेंदिवस फुटत आहेत. यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यावर मानसिक ताण येऊन ते आत्महत्या करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे भारतामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करीत आहेत. आत्ताच ते दिल्लीमध्ये जंतर-मंतर या ठिकाणी भारताची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी तसेच इतरही मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत.
या आंदोलनाला समर्थन द्यावे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी भविष्यात कोणताच स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटू नये, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य व्हावे, पेपर फुटी करणाऱ्या शिक्षकांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, या व इतर मागण्यांकरिता हे एक दिवसीय धरणे आंदोलन वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये करण्यात येणार आहे.
यावेळी बहुसंख्य स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्यिक उपस्थित रहावे, असे आवाहन कॉक्रोज जनता पार्टी महाराष्ट्र प्रवक्ता जगदीश मानवतकर यांनी केले आहे.
या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे.