
Desi Daru Seizure
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई मालेगाव शहरातील नवीन बस स्थानकाजवळ करण्यात आली असून,यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीकडून देशी दारूच्या शेकडो बाटल्या, एक कार,आणि एक मोटारसायकल असा एकूण ६,५०,०००रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास मालेगाव पोलिसांकडून सुरू आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.