Dattatray Bharne | शेतकरी बांधवांनी धैर्य सोडू नये, शासन त्यांच्या पाठीशी: पालकमंत्री दत्ता भरणे

वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळवून देऊ
Dattatray Bharne
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री दत्ता भरणे (Pudhari Photo)
Published on
Updated on

Washim Farmer flood relief

वाशिम : वाशिम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू, पिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Dattatray Bharne
Washim news: वाशिम स्त्री रुग्णालयाला हादरा: प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्राथमिक अहवालानुसार, वाशिम तालुक्यात ९८ गावे बाधित होऊन ३९,३१० हेक्टर क्षेत्रावर, रिसोड तालुक्यात ८५ गावे बाधित होऊन ४८,६४५ हेक्टर क्षेत्रावर, मालेगाव तालुक्यात १२७ गावे बाधित होऊन ५०,३११ हेक्टर क्षेत्रावर, मंगरूळपीर तालुक्यात ७४ गावे बाधित होऊन १०,४८९ हेक्टर क्षेत्रावर, कारंजा तालुक्यात १ गाव बाधित होऊन ५.९९ हेक्टर क्षेत्रावर तर मानोरा तालुक्यात ६ गावे बाधित होऊन १८५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

वाशिम तालुक्यात ३, रिसोड तालुक्यात २ जनावरे व ३ हजार कोंबड्या, मालेगाव तालुक्यात १४ तर मंगरूळपिर तालुक्यात १६ अशा एकूण ३५ जनावरे आणि ३ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. घरांच्या पडझडीत वाशिम तालुक्यात ९७, रिसोड तालुक्यात १८४, मालेगाव तालुक्यात ७२ आणि मंगरूळपिर तालुक्यात ५१ अशा एकूण ४०४ घरांची अंशतः पडझड झाली आहे. जमिनीच्या नुकसानीत वाशिम तालुक्यातील ७ गावांमध्ये १६१ हेक्टर तर मालेगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ६७ हेक्टर जमिनीचे नुकसान होऊन एकूण २२८ हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे.

Dattatray Bharne
Washim Rain | वाशिम जिल्ह्यात संततधार सुरू, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकरी बांधवांनी धैर्य सोडू नये. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनामे तातडीने करून मदत व नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू असून मी स्वतः यावर लक्ष ठेवून आहे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news