RTO action on private travels overcharging Diwali|दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारल्यास थेट कारवाई!

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष तपासणी मोहीम; एसटीच्या भाड्याच्या दीडपटच आकारणीची मर्यादा
RTO action on private travels overcharging Diwali
RTO action on private travels overcharging Diwalifile photo
Published on: 
Updated on: 

वाशिम : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्स बसचालकांकडून होणाऱ्या मनमानी भाडेवाढीला आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. सरकारने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या बस वाहतूकदारांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी दिला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी खासगी प्रवासी बसचा आधार घेतात. याच गर्दीचा फायदा घेत काही ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांकडे अवाजवी भाड्याची मागणी केली जाते. या प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे.

सरकारच्या २७ एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार, खासगी कंत्राटी प्रवासी बसचे भाडे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्वसाधारण बसच्या भाड्याच्या जास्तीत जास्त दीडपट असणे बंधनकारक आहे. सध्या एसटीच्या सर्वसाधारण बसचे भाडे प्रतिटप्पा ११ रुपये ४० पैसे असून, त्याच्या दीडपट दरानुसार खाजगी कंत्राटी प्रवासी बससाठी कमाल मर्यादा प्रतिटप्पा १७ रुपये १० पैसे इतकी आहे. त्यामुळे या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारणे नियमबाह्य ठरणार आहे. प्रत्यक्ष प्रवासाचे भाडे संबंधित मार्गावरील टप्पे आणि लागू भाडे तक्त्यानुसार निश्चित केले जाणार आहे.

जादा भाडे आकारल्यास येथे करा तक्रार!

खासगी ट्रॅव्हल्सकडून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांनी संबंधित बसचा क्रमांक, आकारण्यात आलेले भाडे, स्वतःचे संपूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद करून dyrto.37-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

RTO action on private travels overcharging Diwali
Washim Crime News: वाशिम हादरले! चारित्र्याच्या संशयातून झोपलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला

प्रवाशांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बस वाहतूकदारांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांवर परिवहन विभागाची नजर राहणार आहे.

RTO action on private travels overcharging Diwali
Washim News: दुष्काळाच्या झळांनी हताश शेतकऱ्याने उभ्या केळीच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.