वाशिम: जनावरे चोरी करणारे तिघेजण गजाआड | पुढारी

वाशिम: जनावरे चोरी करणारे तिघेजण गजाआड

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी जिल्ह्यामध्ये होत असलेल्या चोऱ्या तसेच जनावर चोरीचे गुन्हे उघड करणे व गुन्हयांना आळा घालण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी जनावर चोरी करणारे गुन्हेगारांची गोपनीय माहिती काढली.

यावेळी काळ्या रंगाच्या वाहनातील (एम.एच.३१ सीएन ७०६५) मागच्या सीट काढून वाहनाला काळ्या फिल्म लावून जनावरांना आतमध्ये कोंबून घातले जाते. जनावरांना कटाई करण्यासाठी नेले जाते, अशी माहिती मिळाली. त्या आधारे अकोला जिल्हयातील महान येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला असता जनावर चोरी करणारे तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी अब्दुल मत्तिन अब्दुल नबी (वय ३०, रा.महान), शेख अक्रम शेख मोहम्मद (वय २२, रा. अकोट), शेख अलीम शेख महेमुद (वय ४०, रा. महान) यांना ताब्यात घेतले आहे. गाडीत आढळून आलेल्या २ गायी व १ वासरुची वैद्यकीय तपासणी करुन गोरक्षण संस्थेकडे देण्यात आले.

तिन्ही चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे आणून विचारपूस केली असता त्यांनी वाशिम जिल्हयातील वाशिम, रिसोड, मालेगाव, जउळका, शेलुबाजार, मंगरुळपीर या भागातील जनावरे चोरुन नेल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, पोलीस निरीक्षक,  सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, विनोद सुर्वे, राजेश राठोड, आशिष बिडवे,  ज्ञानदेव म्हात्रे, अविनाश वाढे यांनी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button