Wardha Temperature | वर्ध्यात पारा ४३.५ अंशांवर : नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकातील वर्दळ कमी
Temperature update
Temperature updatepudhari photo
Published on
Updated on

Wardha Heatwave

वर्धा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. मंगळवारी (दि.१४) वर्ध्यात कमाल तापमान ४३.०५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मध्यंतरी ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला होता.

मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दिवसभर उष्ण व कोरडे वारे वाहत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकातील वर्दळ कमी झालेली दिसून येते.

Temperature update
Wardha Murder | वर्ध्यात जुन्या वादातून चाकू हल्ला करुन दोघांचा खून!

कडक उन्हामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंगळवारी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाची तीव्रता होती. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news