Wardha Soybean Oil Seized | २.१० लाखांचे नेपाळहून आणलेले निकृष्ट दर्जाचे सोयाबीन तेल जप्त

अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई
Oil Seizure
Oil SeizureAI Photo
Published on
Updated on

Wardha Nepal Oil Seizure

वर्धा : अन्न व औषध प्रशासन विभागाने संशयित कमी दर्जाचे रिफाइंड सोयाबीन खाद्य तेलाचा २ लाख १० हजार ८८० रुपयांचा साठा जप्त केला. शहरातील पटेल चौक भागातील व्यावसायिक आस्थापनेवर ही कारवाई करण्यात आली. नेपाळहून खाद्यतेल आणल्याची माहिती पुढे आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार अधिकारी नियमित कामकाज करीत असताना पटेल चौक, वर्धा, येथे अन्नसुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली.

Oil Seizure
Wardha News | केळी क्षेत्रवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आवश्यकता : कृषि सहसंचालक उमेश घाटगे

त्यावेळी सदर आस्थापनामध्ये रिफाइंड सोयाबीन तेल १५ किलोचे कंपनी पॅक टिन विक्रीकरिता साठविले असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता टिन अत्यंत अस्वच्छ, जंग लागलेले आढळले. रिफाइंड सोयाबीन तेल हे नेपाळवरून आयात केल्याचे आढळून आले. सदर तेल बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये उपलब्ध असल्याने तेलाच्या शुद्धतेबाबत शंका निर्माण झाली.

त्यामुळे अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार अन्न नमुना विश्लेषणाकरता घेऊन ८८ टिन १५ किलोचे एकूण वजन १३१८ किलो, एकूण किमत २,१०,८८० रुपये किमतीचा साठा कमी दर्जा असल्याच्या संशयावरुन जप्त करण्यात आला . नमुना विश्लेषणाकरिता प्रयोगशाळेला पाठविण्यात आला आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदयानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Oil Seizure
Wardha Accident | समृद्धी महामार्गावर ट्रक- कारच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू : एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) प्र. भा. टोपले, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकृत रविराज धाबर्डे यांनी केली. अन्न पदार्थाच्या शुध्दतेबाबत कोणतीही शंका निर्माण झाल्यास त्वरीत अन्न व औषध प्रशासन, वर्धा कार्यालयाशी संपर्क साधावा, किवा ऑनलाइन पोर्टल वर तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायकआयुक्त प्र.भा. टोपले यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news