

Samudrapur Pawangaon Tiger Caged
वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव (करूळ) परिसरात वाघाला पिंजराबंद करण्यात आले. मंगळवारी (दि.२९) सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाघाला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश मिळाले.
समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील करूर पवनगाव परिसरात असलेल्या वाघास पिंजराबंद करण्याकरीता एनएनटीआर रेस्क्यू टीम व पिपल फॉर अॅनिमल रेस्क्युटिम यांना पाचारण करण्यात आले. वनकर्मचारी भागात गस्त करत वाघ (मादी) शोध घेत असताना मंगळवारी रात्रीच्या सुमारास पवनगाव क्षेत्रात वाघाची ओळख पटविण्यात आली.
वाघ पिंजराबंद करण्यासाठी मादी वाघास बेशुध्द करण्याची प्रक्रिया करून पिंज-यात बंद करण्यात आले. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक हरविरसिंह, हरिलाल सरोदे सहायक वनसंरक्षक (तेंदू) यांच्या मार्गदर्शनात स्वप्नील ढोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी समुद्रपूर यांच्या नेतृत्वात डॉ. मेघराज तुलावी, व एनएनटीआर रेस्क्यू टीम, अभिषेक खेडूलकर, पिपल फॉर अॅनिमल वन्यजीव बचाव केंद्राची चमू कौस्तुभ गावंडे
मानद वन्यजीव रक्षक, व्ही. व्ही. चौधरी, क्षेत्र सहायक कोरा, एस. एस. डेहनकर क्षेत्र सहायक मंगरूळ, पी.डी. हिवरकर, एल. जे. गोहणे, आर. एन. चौखे, एस. बी. शेंदरे, एस.एम. वाघ, एस.जे. पटले, प्रणित सुर आदी वनरक्षक तसेच वनपरिक्षेत्र समुद्रपूर अंतर्गत सर्व वनरक्षक व कर्मचारी तसेच आरआरटी व पीआरटी टीम एम. उब्लु. वालदे व एस. एस. दांडेकर वनमजुर व वाहनचालक यांनी कार्यवाही पार पाडली.
वाघीणीला पकडण्यात आल्याची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी पथकाचे अभिनंदन केले.