वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

Lok Sabha Election 2024,
Lok Sabha Election 2024,

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या ४ जूनला होणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे मत मोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. भारतीय खाद्य निगम, बरबडी रोड, वर्धा येथे मतमोजणीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

येत्या ४ जूनला होणार्‍या मतमोजणीसाठी ६०० अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ४०० पोलीसांचा बंदोबस्त राहणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी विधानसभानिहाय नियोजन करण्यात आले आहे.

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघासाठी २७ फेर्‍या, मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी २३ फेर्‍या, आर्वी विधानसभा मतदारसंघासाठी २२ फेर्‍या, देवळी विधानसभा मतदारसंघासाठी २४ फेर्‍या, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासाठी २५ फेर्‍या, वर्धा विधानसभा मतदारसंघासाठी २४ फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.

ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. टपाली मतमोजणीसाठी ९ व इटीपीबीएस मतमोजणीसाठी ५ टेबल असणार आहेत. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यादृष्टीनेही नियोजन केले आहे. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news