Wardha Crime | हिंगणघाट येथे गांजा, अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या सराईत गुन्हेगारावर कारवाई 

Hinganghat Police | स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

Ganja Seized in Hinganghat

वर्धा : हिंगणघाट येथे गांजा अमली पदार्थाची विक्री करणार्‍या सराईत गुन्हेगारावर कारवाई करत पोलिसांनी गांजासह ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करत होते. दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने प्रमोद छन्नु सांडेकर याच्या झोपडीमध्ये एन.डि.पी.एस. कायद्यान्वये छापा टाकला. त्यावेळी आरोपी हा तेथे हजर मिळून आला.

Crime
Wardha Crime : वर्धा पोलिसांची १०६ ठिकाणी 'वॉशआऊट' मोहीम; २ कोटी ३६ लाखांची दारू जप्त

तपासणीदरम्यान त्याच्याजवळ गांजा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी कारवाई करीत ५२४ ग्रॅम गांजा अमली पदार्थ, दुचाकी, मोबाईलसह ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरूध्द हिंगणघाट पोलिस ठाण्यात एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news