
वर्धा : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यात आठ केंद्रातून घेण्यात आलेल्या परिक्षेत ३४१५ परिक्षार्थींनी सहभाग नोंदविला. १८० उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने १० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील आठ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर एक आणि इयत्ता सहावी ते आठवीकरिता पेपर दोन असे दोन पेपर घेण्यात आले. पेपर एक करिता १५४४ तर पेपर दोन करिता २०५१ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. पेपर एक करिता १४६२ परीक्षार्थी उपस्थित होते. पेपर दोन करिता १९५३ परीक्षार्थी उपस्थित होते. दोन्ही मिळून ३५९५ पैकी ३४१५ परीक्षा त्यांनी परीक्षा दिली. परीक्षेच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली. परीक्षेदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.