पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त वर्धा येथील वाहतुकीच्या मार्गात बदल

Prime Minister visit Wardha | पी.एम. विश्वकर्मा योजनेचा शुक्रवारी वर्षपूर्ती सोहळा
 Prime Minister visit Wardha
वर्धा शहरातील वाहतुकीत बदल व पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले आहेत. File Photo
Published on
Updated on

वर्धा: पुढारी वृत्तसेवा : पी.एम. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबी मैदान येथे २० सप्टेंबररोजी होणार आहे. त्याअनुषंगाने वर्धा शहरातील वाहतुकीत बदल व पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतीत नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे. (Prime Minister visit Wardha)

कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून सभास्थळाकडे जाणारा रहदारीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तसेच पार्किंग स्थळाकडे जाणारा मार्ग कार्यक्रमाकरिता येणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनाकरिता रहदारी मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात आला असून जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने व अतिमहत्वाच्या सेवा देणाऱ्या वाहनांना यामधून सुट देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली आहे. (Prime Minister visit Wardha)

वाहतुकीस मज्जाव केलेले मार्ग

सेवाग्राम चौक ते गांधी पुतळा : शासकीय रेस्ट हाऊस, आरती चौक, धुनीवाला मठ, न्यू आर्टस कॉलेज, आर्वी नाका, पावडे चौक कडून वर्धेकडे येणाऱ्या वाहतुकीस मज्जाव केला आहे.

जुनापाणी चौक ते आर्वी नाका : बॅचलर रोड मार्गे पावडे चौक येणाऱ्या वाहतुकीस मज्जाव. स्वावलंबी मैदान (सभास्थळ), संत तुकडोजी मैदान (हेलीपॅड) सभोवताली 200 मीटरपर्यंत येणारे सर्व मार्गावर मज्जाव करण्यात आला आहे. बजाज चौक, शास्त्री चौक, बॅचलर रोड मार्गे स्वावलंबी ग्राउंड कडे येणाऱ्या मार्ग. स्वावलंबी ग्राउंड, संत तुकडोजी महाराज मैदान सभोवताली 200 मीटर पर्यंत व आर्वी नाका ते शास्त्री चौक पर्यंत बॅचलर रोड नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे.

वाहतुकीच्या मार्गात बदल

हिंगणघाट, समुद्रपूर या परिसरातील वाहतूक जाम चौरस्ता मार्गे हिंगणघाट, धोतरा, वायगाव चौरस्ता, सेलु काटे, बोरगाव मार्गे वर्धा येथे येईल. शेडगांव फाटा मार्गे येणारी वाहतुक ही सेवाग्राम चौक, बापू कुटी, नांदोरा, मांडवगड टी पाँईट, आष्टा, भुगाव, सेलु काटे रोड, बोरगाव मार्गे वर्धेकडे येईल. तसेच कारंजा, आष्टी, सेलू परिसरातून येणारी वाहतुक ही साटोडा टी पाँईट, कारला टी पाँईट, जुनापाणी चौक उड्डाणपुल, हिंदी विश्वविद्यालय उड्डाणपूल, शांतीनगर उड्डाणपूल, नागठाणा टी पाँईट, सावंगी टी पाँईट, देवळी नाका दयाल नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गे वर्धा शहराकडे येतील.

वाहन पार्किंग स्थळे

स्वावलंबी डीएड कॉलेज मैदान व जगजीवन राम शाळेसमोरील मैदान, सर्कस ग्राऊंड रामनगर व शितला माता ग्राऊंड येथे व्हीआयपी यांचे वाहनाकरिता पार्किंग. जे.बी. सायन्स कॉलेज मैदान, इदगाह मैदान, कोचर मैदान गणेश नगर, यशवंत जिनींग ग्राऊंड, मॉडेल हायस्कूल ग्राऊंड शिवनगर येथे बसेस व ट्रॅव्हल्स करिता पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सिंदी मेघे ग्रामपंचायत ग्राऊंडवर चारचाकी वाहनाकरिता, अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज रामनगर येथे दुचाकी वाहनासाठी, संत तुकडोजी शाळा मैदान व पोलीस स्टेशन रामनगर मैदान येथे पोलीस वाहनांकरिता, न्यू इंग्लिश शाळा मैदान व केसरीमल कन्या शाळा मैदान येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर नागरिक यांची चारचाकी वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दौरा कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व नागरिकांनी तसेच वरील नमुद मार्गाने प्रवास करणाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थेचा वापर करुन घोषित पार्किंग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवावी. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे.

 Prime Minister visit Wardha
वर्धा : नागपूर-पुणे-नागपूर रेल्वेच्या साप्ताहिक सुपर-फास्ट स्पेशल सहा फेर्‍या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news