

वर्धा : नागपूर ते पुणे रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने नागपूर ते पुणे या दरम्यान साप्ताहिक सुपर फास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ०१२०९ नागपूर-पुणे सुपर-फास्ट एसी स्पेशल २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूरहून १९.४० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ११.२५ वाजता पुण्याला पोहोचेल.
यासोबतच ०१२१० पुणे-नागपूर सुपर-फास्ट एसी स्पेशल रविवारी २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पुण्याहून १५.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ०६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडींना वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि उरुळी असे थांबे आहेत. ८ स्लीपर, २ थ्री टियर, ६ जनरल, २ एसएलआर अशी एकूण १८ अशी संरचना आहे. तसेच एलटीटी-नागपूर- एलटीटी साप्ताहिक सुपर-फास्ट स्पेशल चार फेर्या असणार आहे. ०२१३९ एलटीटी -नागपूर सुपर-फास्ट स्पेशल ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी एलटीटीवरुन ००.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
०२१४० नागपूर-एलटीटी सुपर-फास्ट स्पेशल दर शुक्रवारी १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान नागपूरवरून १३.३० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ०४.१० वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा हे थांबे असतील. ८ स्लीपर, २ थ्री टियर, ६ जनरल, २ एसएलआर एकूण १८ अशी रचना असेल. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.