वर्धा : स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात वर्धा बसस्थानक विभागात दुसरे

वर्धा बसस्थानक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्काराने सन्मानित
Cleanest And Beautiful Bus Station Wardha
स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात वर्धा बसस्थानक विभागात दुसरे Pudhari File Photo
Published on
Updated on

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात वर्धा बसस्थानकाला अ वर्ग बसस्थानकात नागपूर प्रदेशात व्दितीय क्रमांक मिळाला. ५ लाख रुपये रोख, चषक व प्रशस्तिपत्र देऊन आगार व्यवस्थापकांना सन्मानित करण्यात आले आहे.मुख्यमंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या हस्ते १ मे २०२३ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. १ मे २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात वर्धा बसस्थानक नागपूर प्रदेशात व्दितीय क्रमांक प्राप्त झाला.

Cleanest And Beautiful Bus Station Wardha
स्वच्छ, सुंदर स्पर्धेत मेढा बसस्थानक राज्यात प्रथम

प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या हस्ते भंडारा येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. यावेळी विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक वर्धा, परिवहन महामंडळाचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विभागीय स्तरावर विभाग नियंत्रक यांचे अध्यक्षतेखाली सर्वेक्षण समिती नेमुन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत समितीच्यावतीने प्रत्येक बसस्थानकाचे मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये बसस्थानकाची सखोल स्वच्छता, प्रसाधनगृहाची स्वच्छता, बसस्थानक व्यवस्थापन, हरीत बसस्थानक, नियमित करावयाची स्वच्छता, सखोल स्वच्छता, विविध महोत्सवाचे आयोजन या बाबीचे मुल्यांकन करुन गुणांकन देण्यात आले होते. बक्षिसाची रक्कम बसस्थानकाच्या विकासकामासाठी व वर्षभरात स्वच्छताबाबत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी खर्च करण्यात येणार आहे, असे आगार व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news