स्वच्छ, सुंदर स्पर्धेत मेढा बसस्थानक राज्यात प्रथम

पुणे विभागात सातार्‍याची बाजी; लोकसहभागातून राबवले अभियान
Medha Bus stand Come first in Cleanest Busstop in State
साताऱ्यातील मेढा बसस्थानकाची प्रवेश वास्तूRepresentive Photo
Published on
Updated on

सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत क वर्गात राज्यात सातारा विभागातील मेढा बसस्थानकाने बाजी मारली असून या बसस्थानकाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. प्रथम क्रमांकासाठीचे 10 लाख रुपयांचे बक्षीस त्यांना मिळणार आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन विभागात सातारा विभागाने बाजी मारली आहे. मुख्यमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दि. 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत महामंडळाच्या सर्व बसस्थानकामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात आले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारीत हे अभियान राबवण्यात आले. लोकांच्या सहकार्याने बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण करणे, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेत बागबगीचा, वृक्षारोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकावर वॉटर कूलर, घड्याळ, सेल्फी पाईंट यासह अन्य कामे करण्यात आली.

Medha Bus stand Come first in Cleanest Busstop in State
Nashik Mela Bus Stand : राज्यातील पहिले एसी बस स्थानक नाशिक शहरात तयार, उद्या उद्घाटन

यानंतर वर्षभर वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या आधारे बसस्थानकांची निवड करण्यात आली. क वर्ग बसस्थानकांमध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या बसस्थानकाला 10 लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

पुणे प्रादेशिक विभागातही सातारा विभागाने बाजी मारली आहे. अ वर्ग गटात सातारा विभागातील फलटण बसस्थानकाने प्रथम क्रमांक मिळवला असून या बसस्थानकालाही 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. दहिवडी बसस्थानकाला तृतीय क्रमांकाचे 2 लाख 50 हजार रुपये, ब वर्ग गटात कराड बसस्थानकाला द्वितीय क्रमांकाचे 2 लाख 50 हजार रुपये, क वर्ग गटात सातारा विभागातील मेढा बसस्थानकाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपये, औंध बसस्थानकाला द्वितीय क्रमांकाचे 50 हजार रुपये व पुसेसावळी बसस्थानकाला तृतीय क्रमांकाचे 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

Medha Bus stand Come first in Cleanest Busstop in State
बसस्थानक व्यापारी संकुलाची 14 कोटींच्या कामाची निविदा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात सातारा विभागातील महामंडळाच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सांघिक योगदानामुळे हे यश मिळाले आहे. त्यामुळे सातारा विभागाचा नावलौकिक राज्यात वाढला आहे.
रोहन पलंगे विभाग नियंत्रक, सातारा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news