वर्धा : देवळी येथे ४६ ग्रामपंचायतींसाठी १२ जूनला आरक्षण सोडत

वर्धा : देवळी येथे ४६ ग्रामपंचायतींसाठी १२ जूनला आरक्षण सोडत

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : देवळी तालुक्यातील १ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४६ ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूकीसाठी होणाऱ्या महिला सरपंच पदासाठी १२ जूनला आरक्षण निश्चिती करण्यात येणार आहे. या आरक्षण निश्चितीसाठी इच्छुकांनी तहसिल कार्यालय येथे दुपारी १२ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

देवळी तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीसाठी अनुसुचित जाती सरपंच पदे महिला सरपंचपदासह, अनुसुचित जमाती सरपंच पदे महिला सरपंचपदासह, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता सरपंच पदे महिला सरपंचपदासह व खुल्या प्रवर्गातील सरपंचपदे महिला सरपंच पदासह आरक्षण संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये अनुसुचित जातीसाठी आरक्षित करावयाच्या ८ पदापैकी ६ महिला सरपंच पद, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करावयाच्या ७ पदापैकी ३ महिला सरपंच पद, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करावयाच्या १० पदापैकी ५ महिला सरपंच पद व सर्वसाधारण २१ पदापैकी ११ महिला सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षण निश्चितीसाठी संबंधीत ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवळी येथील तहसिलदारांनी केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news