राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सेवाग्राम आश्रमाला भेट

CP Radhakrishnan | गांधीजींच्या आश्रमातील वास्तव्याविषयी घेतली माहिती
Governor CP Radhakrishnan Sevagram visit
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन गांधीजींच्या आश्रमातील वास्तव्याविषयी माहिती घेतली.Pudhari Photo
Published on
Updated on

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

राज्यपालांनी बापू कुटी, बा कुटी, गांधी दफ्तर, पागल दौड आदी निवास व इतर कुटींना भेट दिली. तसेच उपस्थितांशी संवाद साधला. आमदार डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यावेळी उपस्थित होते.

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी राज्यपालांचे सूतमाळेने स्वागत केले. आश्रमातील दैनंदिन कामकाज व महात्मा गांधीजीच्या आश्रमातील वास्तव्याविषयी माहिती राज्यपालांना यावेळी दिली. यावेळी राज्यपालांनी वर्धा येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत सेवाग्राम हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पोलीस विभागाने राज्यपाल महोदयांना मानवंदना दिली. त्यानंतर राज्यपालांनी सेवाग्राम आश्रम येथे बापू कुटीला भेट दिली.

Governor CP Radhakrishnan Sevagram visit
वर्धा जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायती टीबी मुक्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news