

वर्धा : सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पन्नात मोठी घट होणार असल्यामुळे, वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती सरकारने करावी, तसेच या कठीण काळात शेतकऱ्यांना सावरण्याचे बळ द्यावे, ही आर्त हाक भवानी मातेला देत मंगळवारी (दि.३०) अष्टमीच्या दिवशी लहान मातामाय मंदिर येथून ज्योत यात्रा काढण्यात आली. किरण ठाकरे यांचे नेतृत्वात पायदळ निघालेल्या या ज्योत यात्रेत युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नांदोरा, पळसगाव येथील शेतकऱ्यांनी या पायदळ ज्योत यात्रेचे मोठया उत्साहात स्वागत केले. यावेळी किरण ठाकरे यांनी समायोचित विचार व्यक्त केले. ही ज्योत यात्रा भवानीमाता मंदिर आगरगाव येथे पोहोचली व भवानी मातेची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर आगरगाव येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. समारोपीय सभेला किरण ठाकरे, प्रविण कात्रे, ऍड मंगेश घुंगरूड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या पायदळ ज्योत यात्रेत समीर सारजे, सरपंच संदिप दिघीकर, गौतम पोपटकर, मनोज नागपुरे, स्वप्नील मदणकर, मनिष पेटकर, आशिष भोकरे, मंगेश वानखेडे, अविनाश धुर्वे, रुपेश कोठेकर, शरद गोडे, शुभम मानकर, हनुमंत पचारे, प्रदीप खैरकार, प्रणित हुस्नापुरे, खुशाल साळुंखे, रुपेश कडू, उमेश बोरकर, मोहन काळे, किसनाजी लोणकर, सागर येंडे, वृषभ गावंडे,वैभव डफरे,निलेश बोटफोले,मंगेश वरफडे, मनोज डहाके,निवृत्ती हाडके, शाम रुद्रकार, आशिष बोंडे, संदीप ठाकरे इतर पदाधिकारी व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.