Wardha Graduate Voters | वर्धा जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 21 हजार 742 मतदार 

मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी रवाना
Voting for graduate and teacher constituencies
Graduate Constituency Election : file photo
Published on: 
Updated on: 

Nagpur Graduate Constituency Election

वर्धा : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 41 मतदान केंद्रावर मतदान होणार असून सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजता पर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. जिल्ह्यातील 21 हजार 742 पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील 41 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान केंद्रांमध्ये आष्टी येथे 2 मतदान केंद्र, कारंजा 3, आर्वी 6, आंजी मोठी 1, सेलू 2, सिंदी रेल्वे 1, सेवाग्राम 1, वर्धा 11, पुलगाव 2, देवळी 2, समुद्रपूर 2 व हिंगणघाट येथे 8 मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी, मायक्रो ऑब्झर्व्हर अशा 250 च्यावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदान शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पोलिस अधिकारी व पोलिस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Voting for graduate and teacher constituencies
Wardha Crime गांजाची वाहतूक करणारा एकजण ताब्यात, गुन्हा दाखल!

या मतदान केंद्रावर जिल्ह्यातील 21 हजार 742 पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 13 हजार 99 पुरुष मतदार, 8 हजार 643 महिला मतदार असे एकुण 21 हजार 742 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.

निवडणूकच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानेही आवश्यक तयारी केली आहे. मतदान केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था राखणे, मतदारांना निर्भय वातावरण उपलब्ध करुन देणे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क राहणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने पुर्ण तयारी केली असून मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्यादृष्टीने यंत्रणा सज्ज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news