Wardha Crime गांजाची वाहतूक करणारा एकजण ताब्यात, गुन्हा दाखल!

Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

वर्धा : गांजा विक्रीकरिता वाहतूक करणार्‍यावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अंमली पदार्थांची विक्री करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम राबविली आहे. पथकाने गोपनिय माहितीवरून कानकाटी येथे नागपूर ते जाम हायवेवर सापळा रचून वाहनावर छापा टाकला.

यावेळी सारंग विनोद कुंभलकर (वय २८) जाम, ता. समुद्रपूर हा रंगेहाथ गांजा अंमली पदार्थांची विक्री करीता वाहतूक करताना मिळून आला. सदर गांजा हा त्याचे स्वतःचे मालकिचा असून, त्याने भूषण उर्फ मॅड्डी वर्मा रा. दंत्तेश्वरी नगर, नागपुर याच्याकडून खरेदी केला असल्याची माहिती पुढे आली. आरोपी संगणमताने गांजाची तस्करी करून विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी १ किलो १७० ग्रॅम गांजा अमली पदार्थ, मोपेड व मोबाईलसह १ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात समुद्रपूर पोलिस ठाण्यात एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले, प्रतीक वांदिले यांनी केली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news