

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या झळांनी जीवाची लाहीलाही होत असताना बिबट्याचे दोन बछडे मंगरूळपीर तालुक्यातील कोळंबी वनपरिक्षेत्र परिसरात आढळून आले. याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर या परिसरात गस्त लावण्यात आली आहे.
शेतातून येणाऱ्या एका व्यक्तीला बछडे आढळून आले. परंतु या बछड्यांशेजारी त्यांची आई आढळून आली नाही. परंतु रात्री उशिरा त्यांची आई त्यांना घेऊन जंगलात गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. तर वन्य जीव संरक्षक गौरव इंगळे सध्या या परिसरात ठाण मांडून बसले आहेत.
हेही वाचा