नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: मस्कतला जाणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय विमानाचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ओमानच्या सलाम एअरवेजचे हे विमान असल्याची माहिती मिळाली.

नागपूर आल्यानंतर विमानाच्या वैमानिकाला विमानातून धूर निघत असल्याचे दिसल्याने त्याने तातडीने नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला व विमान उतरवण्याची परवानगी मागितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर एटीसीने तातडीने हे विमान उतरवण्याची परवानगी दिली. सुरक्षित विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.

या विमानात सुमारे २०० प्रवासी आणि सात क्रू मेंबर्स होते. ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत या विमानाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अधिक माहिती मिळू शकलेली नाही. प्रवाशांची पर्यायी व्यवस्था केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news