

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_title" view="circles" /]
सिडको, पुढारी वृत्तसेवा : उत्तमनगर येथील मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास टेम्पो व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला तर त्यांचा एक मुलगा जखमी झाला आहे. अबंड पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास टेम्पो चालक हर्षल राजेंद्र गोरे (२९ रा . उत्तम नगर ) हा त्यांच्या चार चाकी टेम्पो (क्रमांक एम एच १५ एच एच ६ ३४१) घेऊन बुरकुले हॉलकडे जात असताना याच मुख्य रस्त्याने शशिकांत श्रीराम अवसरकर (४0 रा विजयनगर,सिडको ) हे त्यांच्या दुचाकी (क्रमांक एम एच १५ डी एच ०३४१) ने पत्नी , मुलगा व मुलगी असे मित्राकडे निघाले होते.
समोरून अचानक टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात शशिकांत अवसरकर यांच्या डोक्यास गंभीर मार लागला आणि तो जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला त्यांचा मुलगा स्वरूप ( वय ९ ) हा जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांना नागरिकांनी माहिती दिली. माहिती मिळताच टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
तसेच, उत्तमनगर येथील नवीन वसाहत झाल्याने नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने वेगाने जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामूळे या रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="true" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_title" view="list" /]
.हेही वाचा