वधूचे लग्नमंडपातून प्रियकरासोबत सिनेस्टाईल पलायन

वधूचे लग्नमंडपातून प्रियकरासोबत सिनेस्टाईल पलायन
Published on
Updated on

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : नियोजित वधू प्रियकरासह मंडपातून सिने स्टाईल पळून गेल्याने नवरदेवाला रिकाम्या हाताने परतावे लागले. वधूने वराला चकमा देत थेट लग्न मंडपातून आपल्या प्रियकरासह पलायन केले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात रविवारी (दि. ८) एका लग्नासाठी वऱ्हाडी मंडळी जमली होती. नवरदेव वाजत-गाजत मित्र परिवारासह लग्नमंडपात जाण्यासाठी निघाला. नवरीही सजून तयार होती. मात्र, झाले उलटेच, वधूने वराला चकमा देत थेट लग्न मंडपातून आपल्या प्रियकरासह सिने स्टाईल पलायन केले.

रिसोड येथील एका संस्थानात रविवारी लग्न सोहळा होता. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नवरदेव वऱ्हाडी मंडळीसह रिसोड शहरातील लग्नस्थळी पोहचले. पाहुणे जमले, नवरदेव मित्र मंडळीसह मोठ्या उत्साहात नाचत होते. लग्न घटिका जवळ आली. नवरी नटली मात्र, नवरीच्या मनात काही उलटेच होते. तिने बहाणा करून आपल्या प्रियकरासह लग्न मंडपातून पलायन केले.

बराच वेळ नवरी आढळून न आल्याने पाहुणे मंडळींनी तिची शोधाशोध घेतली. परंतु ती तिच्या प्रिकराला घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अखेर हताश होत नवरदेव आपल्या पाहुण्यांसह आल्या पावली गेला. या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगत आहे. जग बदलत चालले असून प्रेमाचे संदर्भदेखील बदलत चालले असून युद्धात आणि प्रेमात काय होईल हे सांगणे कठीणच आहे. या घटनेची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news