पुढारी ऑनलाईन डेस्क : अकोला मधुन धक्कादायक घटना समोर येत आहे. काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याने ६ शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपी शिक्षकाला अटक करून पीडित मुलींचे जबाब नोंदवले आहेत.
माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांने सहा शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार अकोला पोलिसांत दाखल झाली आहे. पोलिसांनी तात्काळ शिक्षकाला अटक करून पीडित मुलींचे जबाब नोंदवले आहेत. भारतीय न्याय संहिता आणि पोस्को (POCSO) कायद्याच्या कलम ७४ आणि ७५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू अकोला एसपी बच्चन सिंग करत आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून शिक्षक शाळेत शिकणाऱ्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता, असा आरोप आहे. हा प्रकार घरच्यांना कळताच त्यांनी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.