बुलढाणा : शेषशायी विष्णूमूर्ती सिंदखेडराजा येथेच राहणार, पुरातत्वचे स्पष्टीकरण

बुलढाणा : शेषशायी विष्णूमूर्ती सिंदखेडराजा येथेच राहणार
sheshashayi vishnu statue found in buldhana in maharashtra
बुलढाणा : शेषशायी विष्णूमूर्ती सिंदखेडराजा येथेच राहणारPudhari Photo
Published on
Updated on

बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा

सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराच्या उत्खननात आढळलेली शेषशायी विष्णूची मूर्ती ही सिंदखेडराजा येथेच ठेवली जाणार आहे. ती अन्यत्र स्थलांतरीत केली जाणार नाही असे भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक अरूण मलिक यांनी आज सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले आहे. श्री विष्णूची मूर्ती अन्यत्र हलवली जाणार असल्याच्या वावड्या पसरल्यानंतर काही संघटनांनी व स्थानिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मानकानुसार, उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशायी विष्णूची मूर्ती सिंदखेडराजा येथेच राहणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक अरुण मलिक यांनी दिली.

sheshashayi vishnu statue found in buldhana in maharashtra
Nilesh Lanke | इंग्रजीवरुन हिणवलेल्या लंकेंनी खासदारकीची शपथ घेतली इंग्रजीतून...

भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीजवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे. मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोल भागात शेषशायी विष्णूची मूर्ती आढळून आलेली आहे. ही मूर्ती साधारणतः अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही मूर्ती दीड मीटर बाय सव्वा मीटर आकाराच्या दगडामध्ये कोरली गेलेली आहे. समुद्रमंथन आणि दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम या मूर्तीमध्ये करण्यात आलेले आहे. ही मूर्ती क्लोरियट दगडामध्ये कोरली गेलेली आहे.

sheshashayi vishnu statue found in buldhana in maharashtra
Porsche Car Accident | वेदांत अगरवालला हायकोर्टाचा दिलासा

हा दगड दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून येतो. या दगडावर बारीक कोरीव काम सुलभतेने करणे शक्य असते. भारतीय पुरातत्व विभागाच्या 49 कार्यस्थळांवर याच पद्धतीने पुरातन वस्तू आणि अवशेषांचे जतन करण्यात आलेले आहे. याच नियमानुसार सिंदखेडराजा येथे आढळलेली शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजा येथेच जतन केली जाईल. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीस्थळाच्या परिसरातच ही मूर्ती सुव्यवस्थितरित्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. ही मूर्ती याच परिसरात ठेवण्यासाठी आधी व्यवस्था करण्यात येईल. त्यानंतरच ही मूर्ती हलवण्यात येईल.

sheshashayi vishnu statue found in buldhana in maharashtra
जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात कळवा-मुंब्रा मतदारसंघातून अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढवणार

ही मूर्ती कोणत्या शैलीतील आहे, याबाबत अधिक माहिती समोर येण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. एका आठवड्यामध्ये या मूर्तीबाबत संशोधन होऊन अधिकची माहिती प्राप्त होईल. अशी माहितीही अरूण मलिक यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news