महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अधिवेशन १६ एप्रिल रोजी

खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, नागपूर विभागाचे अधिवेशन रविवार, दि. १६ एप्रिल रोजी कमला नेहरु महाविद्यालय, सक्करदरा चौक येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्षस्‍थान महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील भूषविणार असून स्‍वागताध्‍यक्ष विधान परिषद सदस्‍य आ. अभ‍िजीत वंजारी हे आहेत.

उद्घाटन कार्यक्रमाला विधानसभा सदस्य आ. सुनील केदार, आ. सुभाष धोटे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. विजय वडेट्टीवार, आ. सुधाकर अडबाले, शिक्षक आमदार किरण सरनाईक, ओ.बी.सी. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, माजी मंत्री विनोद गुडधे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

अधिवेशनात 'नवीन शैक्षणिक धोरण आणि अंमलबजावणी' या विषयावर चर्चासत्र होणार असून मुंबई येथील व्याख्याते विकास गरड आपले विचार मांडतील. दुपारी २ वाजता खुले अधिवेशन आणि समारोप होणार आहे. दरम्यान, अशोक जीवतोडे, डॉ. एन. एच. खत्री, बाबुराव झाडे, सीताराम तल्हार, अनिल पाटील, जनाब शफिक अहमद, भाऊ गोस्वामी, राजाबाळ पाटील संगीडवार, राधेलाल पटले, शोभा काळे, सुधीर भातकूलकर, हरीभाऊ दंडारे, राधेश्याम कापगते, गजेंद्र फुंडे, बैस शिवनंदन सिंह रामसेवक यांचा अधि‍वेशनादरम्‍यान सत्‍कार करण्‍यात येणार आहे.

कार्यक्रमाला श‍िक्षण क्षेत्रातील मंडळींनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन म.रा.शि.संस्था, महामंडळ नागपूर विभागाचे अध्‍यक्ष अनिल शिंदे, सरचिटणीस रविंद्र फडणवीस, कार्यवाह किशोर मासूरकर व पदाधिका-यांनी केले. यावेळी रवींद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी आ. अभ‍िजीत वंजारी, अनिल शिंदे, सूर्यकांत खणके यांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news