Nagpur Crime News : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्‍नीची हत्‍या, पतीवर गुन्हा दाखल

या संशयीत आरोपीने सुरुवातीला पत्नी पडून जखमी झाली असल्याचा अपघाताचा बनाव केला
Nagpur Crime News
Nagpur Crime News : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्‍नीची हत्‍या, पतीवर गुन्हा दाखलfile photo
Published on: 
Updated on: 

Wife murdered on suspicion of illicit affair; case registered against husband

नागपूर : पुढारी वृत्तसेवा पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने मारहाण करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कपिलनगर हहीतील कामगारनगर येथे गुरुवारी रात्री उघडकीस आली. या संशयीत आरोपीने सुरुवातीला पत्नी पडून जखमी झाली असल्याचा अपघाताचा बनाव केला मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. लक्ष्मी रोशन शाहकार (वय ३३, रा. न्यू म्हाडा कॉलनी, कामगारनगर) असे मृत महिलेचे नाव असून रोशन किशार शाहाकार (चय ४२) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

Nagpur Crime News
Anil Deshmukh | शांतीवनजवळील कचरा प्रकल्प रद्द करा; अनिल देशमुखांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

प्राप्त माहितीनुसार, संशयित आरोपी रोशन हा कुख्यात गुन्हेगार आहे, तो २००६ मध्ये पाचपावली येथे झालेल्या एका खून प्रकरणात मुख्य आरोपी होता. जुलै महिन्यात तो त्या गुन्यातील जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करून तुरुंगातून बाहेर आला होता. आठ वर्षांपूर्वी तो पैरोलवर बाहेर आला असताना त्याने आपल्या भावाची साली लक्ष्मीशी विवाह केला. सध्या तो प्रादेशिक परिवहन विभागात एजंट म्हणून काम करत होता.

लक्ष्मी एका कपड्याच्या दुकानात नोकरी करत होती. मात्र, तुरुंगातून सुटून आल्यापासून रोशनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, यातून त्‍या दोघांच्यात नेहमी वाद व्हायचे. गुरुवारी रात्री लक्ष्मी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडण झाले.

Nagpur Crime News
Nagpur MD Drug Seized | नागपुरात एमडी जप्त; ओडिशातील आरोपी ताब्यात, दोघे फरार

रागाच्या भरात रोशनने लक्ष्मीच्या कानशिलावर जोरदार व वारंवार प्रहार केले. ती जागीच कोसळली. यावेळी संशयित आरोपीने तिला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याने घराच्या पायऱ्यांवरून घसरून पडल्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्याची खोटी माहिती डॉक्टर व पोलिसांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news