Anil Deshmukh | शांतीवनजवळील कचरा प्रकल्प रद्द करा; अनिल देशमुखांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

प्रस्तावित प्रकल्पामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती
Anil Deshmukh Statement
Anil Deshmukh (Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

Shantivan Garbage Plant

नागपूर : नागपूर ग्रामीणमधील मौजा खडगाव येथील सर्व्हे क्रमांक १५१ मधील शासकीय जमिनीवर प्रस्तावित करण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

भारतीय बौद्ध परिषद, शांतीवन चिंचोली यांनी २३ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रार निवेदनाची दखल घेत देशमुख यांनी प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिक, विविध गावांतील सरपंच आणि ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.

Anil Deshmukh Statement
Railway Police Death Nagpur | गेट-टुगेदर ठरले जीवघेणे: उडी मारताना डोक्याला मार; स्विमिंग पूलमध्ये रेल्वे पोलिसाचा मृत्यू

देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शांतीवन चिंचोली हे केवळ एक भूखंड नसून जगभरातील लाखो आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान आणि धम्मक्रांतीचे केंद्र आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापरातील एक हजारांहून अधिक दुर्मीळ वस्तू येथील संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. तसेच डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मूळ गाभा टाईप करण्यासाठी वापरलेला ऐतिहासिक टाईपरायटरही येथे जतन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळापासून अवघ्या अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर कचरा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव योग्य नसल्याचे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

आरोग्य आणि पर्यावरणाचा मुद्दा

प्रस्तावित कचरा प्रकल्पामुळे वायुप्रदूषण, दुर्गंधी, विषारी वायू, भूजल दूषित होणे तसेच साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती देशमुख यांनी व्यक्त केली आहे. खडगाव, चिचोली, फेटरी, लाव्हा, बोढाळा, सोनबानगर आणि दाबा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Anil Deshmukh Statement
Nagpur Crime : उमरेडमध्ये WCL च्या वरिष्ठ सिव्हिल ओव्हरसियरला ४० हजारांची लाच घेताना सीबीआयचा सापळा

याशिवाय जवळच असलेल्या मिशन इंडिया हॉस्पिटल, बौद्ध धम्म व ध्यानधारणा केंद्र आणि समता सैनिक दलाच्या कार्यालयावरही या प्रकल्पाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

स्थानिक नागरिकांचा विरोध, पर्यावरणीय परिणाम, नागरिकांचे आरोग्य तसेच शांतीवनचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची कार्यवाही तातडीने रद्द करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

या पत्राच्या प्रती नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news