Vijay Wadettiwar | मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे! वडेट्टीवार यांची मागणी

मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे! वडेट्टीवार यांची मागणी
 Vijay Wadettiwar  statement
काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

नागपूर : मनोज जरांगे-पाटील यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सत्य समोर आणल्याबद्दल आभार मानतो. भाजप आणि शिंदे सेनेचा खरा चेहरा त्यांनी महाराष्ट्रासमोर आणला आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद आणि सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल एक ऑडिओ क्लिप ऐकवली, त्याची सत्यता तपासली पाहिजे. या क्लिपमध्ये कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते सत्य जनतेसमोर आले पाहिजे, यासाठी निष्पक्ष चौकशी करावी.

मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा करून महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. सत्तेसाठी समाजा-समाजात भांडणं लावणं हे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

मुख्यमंत्री पदासाठी या दोन्ही पक्षांमधील संघर्ष आता विकोपाला गेला आहे. राज्यात दुष्काळाचे संकट आहे, बेरोजगारी वाढली आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. तरुणांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण सत्ताधारी मुख्यमंत्री पदासाठी राजकारण करताहेत. हे राजकारण केवळ जनतेच्या हिताचे नसून केवळ खुर्चीसाठी सुरू आहे. यात महाराष्ट्राचे नुकसान झाल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

शेतकऱ्यांना परदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्याच्या निर्णयावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत, शेती संकटात आहे, अशा वेळी केवळ अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करून सरकारची जबाबदारी संपत नाही.

 Vijay Wadettiwar  statement
Nagpur Graduates Constituency Election | पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मतदानादिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील 'हे' आठवडी बाजार बंद

केवळ १८० शेतकऱ्यांनाच परदेशात पाठवण्याऐवजी एक हजार शेतकऱ्यांना संधी द्यावी. राज्यातील प्रत्येक विभागातून किमान २०० शेतकऱ्यांची निवड करावी. दुष्काळात शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपये देऊन बोळवण करण्यात येते आहे. त्यापेक्षा भरीव मदत करावी, दुष्काळाला सरकारने प्राधान्य द्यावे असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

 Vijay Wadettiwar  statement
Nagpur News : ५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा ; विराआंस, शेतकरी संघटनाचे "भीक मांगो"आंदोलन!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news