

नागपूर : वाळू डेपो हे माफियांचे अड्डे बनले आहेत. ज्या उद्देशाने वाळू धोरण आणले याचा हेतू साध्य होताना दिसत नाही आहे, अशी टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली. त्यावर वाळू धोरणातील त्रुटी दूर करून त्यामध्ये आणखी सुधारणा करण्यात येतील. यामध्ये नव्या बाबींचा समावेश करताना कोणाचेही हित जपणार नाही, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली.
पटोले यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे वाळू धोरणाचा मुद्दा उपस्थित करत त्या धोरणावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना विखे-पाटील यांनी वाळू धोरणाला काही ठिकाणी यश आल्याचे, तर काही ठिकाणी अपयश आल्याचे मान्य केले.