

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
Vijay Wadettiwar: सत्य, अहिंसा आणि संविधानाच्या मार्गाने लढणाऱ्या एका निःशस्त्र गांधीवादी शास्त्रज्ञावर हजारो पोलिसांचा गराडा घालण्याइतके केंद्र सरकार असुरक्षित झाले आहे का? असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सलग २० दिवसांच्या उपोषणामुळे शरीर क्षीण झालेल्या सोनम वांगचुक यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करताना केंद्र सरकारला लाज वाटली नाही का?सत्याग्रहाला दडपशाहीने उत्तर देणे ही लोकशाहीची नव्हे, तर हुकूमशाहीची ओळख आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची हेळसांड करणाऱ्या शिक्षणमंत्र्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारने आज दडपशाहीच्या सर्व मर्यादा पार केल्या. संवाद हा भारताचा आत्मा आहे, लोकशाहीचे तत्व आहे.
मोदी सरकारने सोनम वांगचुक यांच्यासोबत कोणताही संवाद न करता थेट त्यांना फरफटत नेले, ही अघोषित आणीबाणी आहे! अशा तीव्र शब्दात वडेट्टीवार यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.