Vijay Wadettiwar | महापौर सोडत भाजपचे फिक्सिंग : विजय वडेट्टीवार

Maharashtra Mayor Reservation | भाजपचे नगरसेवक निवडून आले, त्या सोयीने आरक्षण पडल्याचा गंभीर आरोप
Maharashtra Mayor Reservation
Vijay Wadettiwar Pudari
Published on
Updated on

Maharashtra Mayor Reservation

नागपूर : मुंबईत २९ महापालिका महापौर आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली. पण ही फिक्सिंग होती, पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पाडली गेली नाही. भाजपचे नगरसेवक निवडून आले, त्या सोयीने आरक्षण पडल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

नागपुरात खुला महिला प्रवर्ग आला. त्यासाठी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार शिवानी दाणी या ठरल्या होत्या आणि आज तसेच आरक्षण पडले असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.

मुंबईतील मनसे नेत्यांनी चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे तारे तोडले याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे हे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले? लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम मनसेने करू नये.मनसे भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसने केली तर चालेल का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

Maharashtra Mayor Reservation
Vijay Wadettiwar | चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होणार, संख्याबळाची जुळवाजुळव : विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात भाजप आणि MIM हे पक्ष एकत्र आहेत, ते रात्री एकत्र जेवतात दिवसा भांडतात.काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.त्यांना रसद कोण पुरवते,ताकद कोण देते हे महाराष्ट्रातील जनतेला कळेल अशी टीका केली .

वाराणसी येथील मणिकर्णिका घाट भाजप सरकारने जमीनदोस्त केला.आता भाजपचे नेते का बोलत नाही? भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकीसाठीच आहे ,सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करतात अशी टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Maharashtra Mayor Reservation
Vijay Wadettiwar Chandrapur Election Result: भाजपने चंद्रपूरचा बट्ट्याबोळ केला, जनतेनेच बदला घेतला; विजय वडेट्टीवार

चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा

चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

चंद्रपुरात पाच वर्ष काँग्रेसचा महापौर असणार,सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार असाही दावा केला. काँग्रेस नेत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने चंद्रपुरात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

Maharashtra Mayor Reservation
Vijay Wadettiwar | निवडणुकीच्या तोंडावर योजनांचे पैसे देता; भाजपवाले पागल झालेत का?: विजय वडेट्टीवार

भाजपचे कोणतेही नेते कितीही ओरडले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार आहे. नेत्यांमध्ये गैरसमज होत असतात पण कार्यकर्ता हा महत्वाचा असल्याने त्यांना समाधान वाटेल असा निर्णय घेण्यात येईल. महापौर बसविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा झाली आहे. शिवसेना हा पक्ष काँग्रेस बरोबर सत्तेत असेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news