

Uday Samant Helicopter Snag: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे नागपूरहून गडचिरोलीला हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते. मात्र त्यांचे हिलेकॉप्टर टेक ऑफ घेतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आलं. त्याने उड्डाण थांबवल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, स्थानिक शिवसैनिकांनी हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणीत बिघाड लक्षात का आला नाही याची चौकशी करण्याची मागणि केली आहे.