Tigress Death Nagpur | नागपूर - वर्धा रोडवरील जामठा परिसरात रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि ब्रह्मकुमारीज आश्रमाच्या शेजारी रेल्वे रुळावर घटना
Nagpur Railway Track Tiger Death
जामठा परिसरात रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला.
Published on
Updated on

Nagpur Railway Track Tiger Death

नागपूर : नागपूर - वर्धा रोडवरील जामठा परिसरात रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१८) उघडकीस आली आहे. बुटीबोरी वन परिक्षेत्र अंतर्गत झालेल्या या घटनेत वाघाचा मृत्यू धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

जामठा परिसरातील पोल क्रमांक ८१९/२२ जवळ, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि ब्रह्मकुमारीज आश्रमाच्या शेजारी रेल्वे रुळावर ही घटना घडली. यात मृत्युमुखी पडलेला वाघ वन विभागाच्या मते उपप्रौढ (मादी) वाघ होता. या वाघाचे अंदाजे वय सुमारे १.५ वर्षे असल्याची माहिती वन विभागाने दिली.

Nagpur Railway Track Tiger Death
Nagpur Student March | नागपुरात 'यूजीसी इक्विटी बिल २०२६' च्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news