Nagpur Student March | नागपुरात 'यूजीसी इक्विटी बिल २०२६' च्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित विधेयकाला जाहीर पाठिंबा दर्शवला
UGC Equity Bill 2026
'यूजीसी इक्विटी बिल २०२६' च्या समर्थनार्थ नागपूर शहरात 'समर्थन मोर्चा' काढण्यात आलाPudhari
Published on
Updated on

UGC Equity Bill 2026

नागपूर: उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करणाऱ्या 'यूजीसी इक्विटी बिल २०२६' च्या समर्थनार्थ आज (दि.१७) नागपूर शहरात 'समर्थन मोर्चा' काढण्यात आला. 'यूजीसी समर्थन कृती समिती' च्या वतीने आयोजित या रॅलीमध्ये हजारो विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी सहभागी होऊन केंद्र सरकारच्या या प्रस्तावित विधेयकाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.

इंदोरा येथील ऐतिहासिक भीम चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. निळ्या पटका आणि हातात समर्थनाचे फलक घेऊन निघालेला हा मोर्चा १० नं. पुलिया, कडबी चौक, गड्डीगोदाम, एलआयसी चौक मार्गे शिस्तबद्ध पद्धतीने संविधान चौकात पोहोचला. "समान शिक्षण, समान अधिकार" आणि "यूजीसी इक्विटी बिल लागू करा" अशा घोषणांनी उत्साह संचारला होता.

UGC Equity Bill 2026
Nagpur Crime | नागपूर हादरले: भाजप नगरसेविकेचा पती जीवघेणा हल्ल्यात गंभीर जखमी

भेदभावमुक्त शिक्षणाची मागणी

संविधान चौकातील सभेत बोलताना आयोजकांनी या विधेयकाचे महत्त्व विशद केले. हे विधेयक प्रामुख्याने एससी (SC), एसटी (ST) आणि ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांवरील संस्थात्मक भेदभाव थांबवणे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये छळमुक्त आणि सन्मानजनक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार कायदेशीर संरक्षण मिळवून देणे यावर लक्ष केंद्रित करते.

"हे विधेयक बाबासाहेबांच्या समतावादी भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आजचा हा मोर्चा केवळ समर्थन नाही, तर शिक्षण क्षेत्रातील विषमतेविरुद्ध पुकारलेला एल्गार आहे," असे समितीचे निमंत्रक अ‍ॅड. निखिलेश मेश्राम यांनी नमूद केले.शेवटी, विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत केंद्र सरकारला समर्थनाचे निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली.

UGC Equity Bill 2026
Nagpur Crime | कुणाला पेट्रोल पंप, गॅस एजन्सी तर कुणाला नोकरी: केंद्रीय मंत्रालयाच्या नावे 2 कोटींचा गंडा!

या रॅलीचे यशस्वी नियोजन अ‍ॅड. निखिलेश मेश्राम, अ‍ॅड. मिथिलेश मेश्राम, प्रफुल्ल खोब्रागडे, अथांग करोडे, नंद किशोर माटे, प्रिती ताई खांडेकर, मंगेश नागदेवे, बोनी वालदे, देवेंद्र ताराम, रोहित लिपीची, उमेश कोर्राम, शशिकांत बोरकर, गौरव शहारे, नरेश भांगे, वैभव बोरकर, कपिल मेश्राम, रवी चव्हाण, रवी शाहू, प्रज्वल वासनिक आणि रणजीत वाणी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news