रामटेक आणि दक्षिण नागपूरवरून ठाकरे सेना-काँग्रेसमध्ये घमासान!

काँग्रेची विदर्भात 10 ते 12 जागांची मागणी
Nagpur News
काँग्रेस- शिवसेना उबाठात पेटली संघर्षाची मशाल !Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, राजेंद्र उट्टलवार : राज्यात कोणाची सत्ता येणार हे ठरविणासाठी विदर्भातील 62 विधानसभेच्या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. मुंबईत सेनेला झुकते माप देणाऱ्या काँग्रेसने लोकसभेनंतर विधानसभेतही विदर्भातील अधिकाधिक जागावर दावा ठोकला असून शिवसेना उबाठाने किमान 9 ते 10 जागा मागितल्या आहेत. यामध्ये नागपुरातील दक्षिण नागपूर, रामटेक या दोन महत्त्वाच्या जागांवरून शुक्रवारी (दि.18) घमासान सुरू होते.

Nagpur News
Assembly Election : विधानसभा आचारसंहिता, उमेदवार कार्यकर्त्यांवर निर्बंधांचा अंकुश

काँग्रेस या जागा सोडण्यास तयार नाही तर शिवसेनेनेही आपली दावेदारी कायम ठेवली आहे. आता दिल्ली दरबारी हा वाद पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीला रामटेक आम्ही काँग्रेसला दिले, आता काँग्रेसने त्याची परतफेड करावी अशी भूमिका शिवसेना उबाठा गटाची आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्व नागपूर हवे असले तरी केवळ काटोल निश्चित मानले जात आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या कळमेश्वर दौऱ्यातही ही भावना खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेच्या निमित्ताने बोलून दाखवली होती. दुसरीकडे दक्षिण नागपुरात काँग्रेसचे गिरीश पांडव गेल्यावेळी थोडक्यात पराभूत झाले. यावेळी पांडव समर्थक उत्साहात आहेत.

Nagpur News
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी PM मोदींची मोठी तयारी

मानेवाडा स्थित बाकडे सभागृहात एक बैठकही आयोजित केली होती. मात्र मुंबईत सेना- काँग्रेसमधील ताण-तणावानंतर ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. दक्षिण आणि पूर्व नागपूरचा काही भाग असा हा मतदारसंघ शिवसेनेला पोषक असल्याचे सांगत प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरियानी येथून दावा ठोकला आहे. सेना काँग्रेसच्या या वादात या मतदारसंघात 'सांगली पॅटर्न' देखील पाहायला मिळू शकते अशी जोरात चर्चा आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे सुपुत्र राज्य सोशल मीडियाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रवक्ते अतुल लोंढे, संजय महाकाळकर असे 14 दावेदार इच्छुक आहेत. अर्थातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे जिंकतात की, शिवसेना शिवसेना नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news