

TET exam deadline extended
नागपूर : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षा रविवारी (दि. २३) घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत होता. मात्र, आता ९ ऑक्टोबररोजी रात्री ११. ५९ पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात काही जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी / उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी ९ ऑक्टोबर रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच विद्यार्थी/उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांना नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड द्वारे विहित कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही.